
आयुष्य कसं.. डोळ्यात चमकणाऱ्या स्वप्नासारखं हवं
हसतं, खेळतं स्वतःच्याच रंगात गुंतलेलं
कधी घेत उंच भरारी, कधी छोट्याश्या आशेची एक कळी
कधी कर्तबगारीचा जिना तर कधी हळूवार चढावी अशी पायरी
आयुष्य कसं.. वाहत्या निर्मळ नदीसारखं हवं
स्वच्छंद, स्वतंत्र, सतत पुढे वाहत राहणारं
कधी खळखळता आवाज, कधी धबधबा तर कधी संथ
कधी सर्वांना सामावून घेणारं तर कधी कोणाचंच न ऐकणारं
आयुष्य कसं.. त्या लपाछपी खेळणाऱ्या इंद्रधनुष्यासारखं हवं
सर्व रंगानी सजलेलं असूनही, पावसासोबतच येणारं
जेवढी गरज तेवढंच दिसणारं
कधी निसर्गात सौंदर्य भरणारं, तर कधी स्वतःलाच सुंदर समजणारं
कधी लांबूनच मन प्रसन्न करणारं, तर कधी जवळ असूनही हातात न येणारं
आयुष्य कसं.. अगदी साधं सोपं असावं
प्रेमाची ओढ लावणारं, प्रेमात चिंब भिजलेलं
खुपच सुंदर अपर्ना मँम.. आयुष्य कसं अवघड कोडं असाव.. ज्याचे उत्तर शोधताना कंटाळा नाही तर शेवट समाधानी असावा…
LikeLike